प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा अभिमान… देशभक्तीचा संकल्प! 
रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा…
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा…
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा…
दिन हा स्वातंत्र्याचा चिरायू व्हावा! 
दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशालेत देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याने सामूहिक गायन झाले. राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडा गीताने कार्यक्रमाची शोभा वाढली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मा. मुख्याध्यापिका श्रीम. दीपा अभ्यंकर यांनी स्वच्छता ,वैचारिक क्रांती, व आरोग्य या विषयावर काम करणे गरजेचे असून मानसिकता बदलून  आपण छोट्या छोट्या गोष्टींवर काम केले पाहिजे, तसेच जबाबदार व समंजस नागरिक घडवणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले.राजा श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती सायली केरीपाळे  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बँड पथक व विद्यार्थिनींनी मानवंदना दिली. 
प्रमुख पाहुण्या श्रीमती सायली केरीपाळे  यांनी “स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल” असा प्रेरणादायी संदेश दिला व क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले.शालेय समिती अध्यक्षा डाॅ. प्रीती अभ्यंकर यांनी ,स्वयंप्रेरित व्हा व आपल्या वर्तनातून स्वच्छता पाळा तसेच कोणत्याही खेळामध्ये इतरांशी स्पर्धा करण्याआधी स्वतःशी स्पर्धा करा असा संदेश दिला.यावेळी गुणवंत शिक्षक  व विद्यार्थिनींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.देशभक्तीपर गाण्यावर कवायतीचे प्रकार सादर करण्यात आले.याप्रसंगी शालेय समिती अध्यक्षा डॉ. प्रीती अभ्यंकर , मा. मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, मा. उपमुख्याध्यापक सुरेश वरगंटीवार, मा. पर्यवेक्षिका स्वाती जज्जल तसेच शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका श्रीमती रोहिणी पानसे यांनी केले.

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स