- Events /
- राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनींमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, खेळाचे महत्त्व समजावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध मैदानी खेळांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेने व मेहनतीने तयार केलेल्या विविध क्रीडा प्रतिकृतींचे त्यांनी कौतुक केले आणि विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सुमधुर स्वागतगीत व क्रीडागीत सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील क्रीडेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडेविषयी आवड निर्माण करणे, नियमित खेळाचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या अध्यक्षा मा. शुभांगी मुळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींना खेळातील विविध पैलू उलगडून सांगितले. खेळ हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना विकसित करणारा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींच्या जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असून शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही महत्त्व दिले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.विद्यार्थिनींनी क्रीडाविषयक प्रतिज्ञा घेतली. खेळातील शिस्त, प्रामाणिकपणा, सातत्य आणि खिलाडूवृत्ती जपण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यानंतर शाळेची आरोळी व क्रीडादिनानिमित्त विविध उत्साहवर्धक घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब राजगुरुनगर चे सदस्य आणि ज्यांना ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखले जाते असे मा. मंगेश हांडे यांनी PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून खेळाचे महत्त्व, नियमित व्यायामाचे फायदे आणि क्रीडेमुळे होणारा व्यक्तिमत्त्व विकास याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींची क्रीडाविषयक प्रश्नमंजुषाही घेतली, ज्यामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच ‘आयर्न मॅन’ होण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्द याविषयी आपले अनुभव सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.या कार्यक्रमासाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षिका माधवी पांढरकर, शुभदा राजगुरू, विजया हजारे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभदा राजगुरू यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका भालचिम यांनी केले.विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग, विविध क्रीडा प्रतिकृतींचे प्रदर्शन, पाहुण्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More