- Events /
- HPV लसीकरण मोहीम
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे येथे जीविका फाउंडेशन यांच्या वतीने ९ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींसाठी एचपीव्ही (HPV) गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली.या उपक्रमात विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करून एचपीव्ही लसीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर एकूण २४० विद्यार्थिनींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणामुळे विद्यार्थिनींना भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.या लसीकरण मोहिमेसाठी जीविका फाउंडेशनच्या डॉ. अलिशा भालेराव, प्राची दाळु, श्रद्धा गोरे आणि जुई तलवारकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींची तपासणी, समुपदेशन व लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत दक्षतेने पार पाडली.
सदर उपक्रम मुख्याध्यापिका सौ. दीपा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्याध्यापक श्री. सुरेश वरगंटीवार, पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती जज्जल तसेच विभाग प्रमुख श्रीमती माधवी मांडळकर यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न झाला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जीविका फाउंडेशनच्या टीमच्या उत्कृष्ट समन्वयामुळे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत व शिस्तबद्ध वातावरणात पूर्ण झाली.विद्यार्थिनींच्या आरोग्य संरक्षणासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. भविष्यातही अशा आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्यात याव्यात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जीविका फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रशालेतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More