प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे येथे विज्ञान मंडळ व पर्यावरण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘औषधी वनस्पतींबाबत जनजागृती’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर हे अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पर्यावरण आणि परंपरा यांची विविध उदाहरणे देऊन सांगड घातली. प्रत्येकाने निसर्गाशी आपला संपर्क वाढवावा हे सांगितले.या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना औषधी वनस्पतींची ओळख, त्यांचे महत्त्व, विविध उपयोग तसेच औषधी वनस्पतींचे संवर्धन याबाबत शास्त्रीय व उपयुक्त माहिती दिली. आपल्या परिसरातील वनस्पतींचे जतन करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये औषधी वनस्पतींबद्दल जिज्ञासा निर्माण होण्याबरोबरच त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि संवर्धनाची गरज याबाबत जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमासाठी सिल्वर एज या संस्थेच्या श्रीम. पिनल वानखेडे आणि शाळेची माजी विद्यार्थिनी सायली सौंदणकर यांनी अहिल्यादेवी परिवारातील सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी १६५० तुळशीची आणि ५० विविध औषधी वनस्पतींची रोपे दिली. 'एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थिनी हे रोप आपल्या घरी रुजवणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना  निसर्गाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापक सुरेश वारगंटीवार, पर्यवेक्षिका स्वाती जज्जल, शिक्षक प्रतिनिधी शुभदा राजगुरू तसेच विज्ञान मंडळ प्रमुख अपर्णा कुलकर्णी  व पर्यावरण मंडळातील शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता रामदासी यांनी केले. विद्यार्थिनींचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स