अभ्यासक्रम
शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ (एस.एस.सी बोर्ड) ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे पालन करते.
- इयत्ता - ५ वी ते १० वी, माध्यम - मराठी, सेमी इंग्रजी, सत्र - एका शैक्षणिक वर्षात दोन सत्र असतात.
- सर्वसाधारण अभ्यासक्रम-
- इ. ५वी ते ८वी - मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, शा.शिक्षण, कला, कार्यानुभव, संगणक
- इ. ९वी ते १०वी – मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल,
- श्रेणीबद्ध विषय: शारीरिक शिक्षण, जल सुरक्षा, गाईड
- कौशल्यविकास, कला, क्रीडा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणासारख्या मुख्य विषयांचा समावेश आहे.
शाळेविषयी
१. एका शैक्षणिक वर्षात दोन सत्र असतात.
- पहिले सत्र : जून ते ऑक्टोबर
- दुसरे सत्र : ऑक्टोबर ते एप्रिल
२. शाळेची वेळ -
- सोमवार ते शुक्रवार - सकाळी 10.40 ते दुपारी 4.45
- शनिवार - सकाळी 7.20 ते 11.45
प्रगती
- सर्व विषयांमध्ये शासकीय नियमांनुसार उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- उपस्थिती : प्रत्येक सत्रात कमीत कमी ७५% उपस्थिती अनिवार्य.
- गणवेश : नियमित (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) , खेळाचा गणवेश (बुधवार, शनिवार)
- कमकुवत विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग.
सह-अभ्यासक्रम उपक्रम
- शिष्यवृत्ती परीक्षा – शासकीय इ. 5 वी आणि 8 वी
- DES शिष्यवृत्ती - इ. 7 वी
- महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTS)
- डॉ. होमी भाभा परीक्षा
- संस्कृत स्पर्धा परीक्षा
- चित्रकला ग्रेड परीक्षा - एलिमेंटरी / इंटरमिजिएट
- टि.म.वि आयोजित परीक्षा- इंग्रजी, संस्कृत, गणित इ.
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी
- शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन, राष्ट्रीय क्रीडा दिन, विज्ञान दिन, गणित दिन आणि भूगोल दिन असे महत्त्वाचे कार्यक्रम साजरे करतो.
- गुरुपौर्णिमा, गणेश चतुर्थी आणि नवरात्र (भोंडला) सारखे सण शाळेत सांस्कृतिक चैतन्य निर्माण करतात, ज्यामुळे एक संतुलित वातावरण तयार होते. विद्यार्थिनी बौद्धिक आणि सर्जनशील दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करतात.
- विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी – कला, क्रीडा, वक्तृत्व, नाट्य, अभिवाचन, प्रकल्प इ.