प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

२६ जानेवारी २०२६ : आजच्या ७७व्या प्रजासत्ताक दिन समारोहाची सुरुवात  कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या प्रशालेच्या संगीत शिक्षिका श्रीम. मानसी देशपांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होऊन झाली. या प्रसंगी शालासमितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती प्रीती अभ्यंकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी मा. नीलिमा अडसूळ  प्रशालेच्या  मुख्याध्यापिका मा. श्रीमती दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापक मा. श्री. सुरेश वरगंटीवार व पर्यवेक्षिका मा. श्रीमती स्वाती जज्जल, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्या सोबतच संपूर्ण शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग , विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते.  
 
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना श्रीम. मानसी देशपांडे यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करत डेक्कन एज्युकेशन सोसायटीत आणि अहिल्यादेवी प्रशालेत सेवेची संधी मिळाली याबद्दल स्वतःला खूप कृतकृत्य वाटत आहे असे सांगितले.  
 
शाळासमिती अध्यक्षा डॉ. प्रीती अभ्यंकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना स्वावलंनाचे महत्त्व सांगितले. यात त्यांनी उदाहरणातून म्हटले की ही छोटीशी गोष्ट देखील घरापासून सुरू करून देशापर्यंत याचे योगदान कसे महत्वपूर्ण ठरेल.  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, ‘ संविधान दिन` या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रशालेतील विविध क्रीडा प्रकार जसे की योगासने, सूर्यनमस्कार,  कॅलेस्थेनिक्स, घोषवृंद, लेझीम यांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाची नियोजनबद्ध गुंफण श्रीम. चित्रा पवार यांनी केली. प्रात्यक्षिकांसाठी श्रीम. शुभदा राजगुरू यांनी निवेदन केले. 

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स