प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्रीमती सुनीता गोडबोले यांचा सन्मान

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्रीमती सुनीता गोडबोले यांचा सन्मान

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्रीमती सुनीता गोडबोले यांचा सन्मान

९ फेब्रुवारी २०२६: प्रशालेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्रीमती सुनीता गोडबोले या माजी विद्यार्थिनीचा प्रशालेत सन्मान करण्यात आला.त्यांचे आगमन होताच प्रशालेच्या घोषवृंदाने अतिशय सुरेख मानवंदनासंचलन करून तर विद्यार्थिनींनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. पूर्वाश्रमीच्या सुनीता पुराणिक या अहिल्यादेवी शाळेच्या माजी विद्यार्थिनी आपल्या प्रास्ताविकात मा.मुख्याध्यापक श्रीमती दीपा अभ्यंकर यांनी निरपेक्ष वृत्तीने काम करत राहणे याचे सुनीता ताई हे एक मूर्तिमंत उदाहरण  आहे असे सांगितले.  नक्षलग्रस्त बस्तर या संवेदनशील क्षेत्रात त्यांनी दंतेवाडामधून कामाला सुरुवात केली. स्थानिक बोलीभाषेतून तेथील लोकांशी  सहज संवाद साधत गोडबोले पतीपत्नींनी काम केले आहे.शिक्षण,आरोग्य असे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कार्य केले आहे ,योगदान दिले आहे. 

विद्यार्थिनींशी संवाद साधताना पुरस्कारानंतर पहिलाच कार्यक्रम शाळेत होतो आहे याचा विशेष आनंद होत असून आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या आठवणी सांगत शालेय जीवनातील जडणघडण सुनीताताईंनी सांगितली. काम करताना मराठीतले शब्द इतर भाषांमध्ये पाहून भारतीय म्हणून जोडून घेणे शक्य झाले. सामाजिक काम करण्याचा निश्चय करून गोडबोले दाम्पत्याने दंतेवाड्यात कामाला सुरुवात केली.शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली.स्थानिक लोकांच्या प्रेमाने,आपुलकीने हे काम करत गेलो,रमत गेलो.निराशा आली तरी सगळ्यांच्या आधाराने,आपुलकीने त्यावर मात करता आली. म्हणून उपेक्षित असणाऱ्या आदिवासींना आत्मविश्‍वास, आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला.'ग्रामवासी हो नगरवासी या हो वनवासी हम सब है भारतवासी 'ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला.असे सुनीताताईंनी मनोगतात सांगितले. 

डे.ए.सो.चे अध्यक्ष श्री. प्रमोद रावत यांनी आपल्या मनोगतातून तुकारामांची,शिवरायांची करुणा मनात ठेवून उपेक्षित घटकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न पाहून ते साकारण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या सुनीता ताईंचा अभिमान वाटतो असे सांगून अभिनंदन केले. प्रशालेतर्फे त्यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. त्यात त्यांचे कार्य म्हणजे माणुसकीची ग्वाही आसून त्यांचे कार्य चिरस्मरणीय आहे.त्यांनी लावलेला ज्ञानदीप सदैव प्रकाशित करत राहील .त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना शाळेच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण असून सुवर्णाक्षरात नोंदला जाणार आहे.अशा शब्दांत शालामातेला त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी वाटणारा सार्थ अभिमान व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विज्ञान प्रकल्प ,कडधान्य पाककृती स्पर्धेत विजेतेपद मिळालेल्या विद्यार्थिनींचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. त्यानंतर मुलींनी दिलेल्या शाळेच्या आरोळीने सभागृह भारावून गेले.सुनीता ताईंनीसुद्धा त्यात सहभागी होत आरोळी दिली. 


या दिमाखदार अभिमानसोहळ्यासाठी डे.ए.सो .अध्यक्ष मा.श्री.प्रमोद रावत,उपाध्यक्ष मा.श्री.अशोक पलांडे, कार्यवाह मा. श्री.डॉ.आनंद काटीकर ,प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा मा.डॉ.प्रीती अभ्यंकर, वित्तनियामक मा.श्रीमती प्राजक्ता प्रधान,रमणबाग प्रशाला शालासमिती अध्यक्ष मा.डॉ.शरद आगरखेडकर, न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोड प्रशालेचे शालासमिती अध्यक्ष मा.श्री.अमित कुलकर्णी ,प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापक मा.श्री.सुरेश वरगंटीवार,पर्यवेक्षक मा.श्रीमती स्वाती जज्जल तसेच सुनीता ताईंच्या मैत्रिणी आणि स्नेही व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते. या अनुपम कार्यक्रमाचे आभार प्रशालेच्या पर्यवेक्षक मा.श्रीमती स्वाती जज्जल यांनी मानले . सूत्रसंचालन श्रीमती अर्चना अभ्यंकर यांनी केले तर परिचय श्रीमती दीपाली थोरात यांनी करून दिला.

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स