- Events /
- प्रशालेत ७९वा स्वातंत्र्यदिन समारोह संपन्न!
प्रशालेत ७९वा स्वातंत्र्यदिन समारोह संपन्न!
अहिल्यादेवी प्रशालेमध्ये नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती धनश्री धावरे यांच्या शुभहस्ते व शाला समितीच्या अध्यक्षा डॉ .प्रीती अभ्यंकर तसेच मा. मुख्याध्यापिका श्रीम. दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापक श्री सुरेश वरगंटीवार व पर्यवेक्षिका श्रीम. स्वाती जज्जल यांच्या बरोबरच संपूर्ण शिक्षक वृंद, शिक्षकेतर, सेवक वर्ग, विद्यार्थिनी आणि पालकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्नझाले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजप्रतिज्ञा व अतिशय दिमाखदार पद्धतीने मानवंदना संचलन झाले. ध्वजवंदन,राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत, ध्वजप्रतिज्ञा संपन्न झाली तसेचत्यानंतरउपस्थितांनी झेंडा गीताचे समूह गान केले.
भारत विकास परिषद तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या समूह गान स्पर्धेत प्रशालेच्या संघटन गढे चलो.... सुपंथपर बढे चलो.... या हिंदी गीतास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. यानिमित्त या गीताचे गायनही विद्यार्थिनींनी केले.
आपल्या प्रास्ताविकात मा. मुख्याध्यापिका श्रीमती दीपा अभ्यंकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अपेक्षित असलेल्या नवभारताचे चित्र सर्वांसमोर उभे केले. त्यात पालक व विद्यार्थिनी यांना त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही केले. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती धनश्री ढावरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तस्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाच्या आठवणींना उजाळा देत सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थिनींना भारत देशाच्या भविष्यअसे संबोधित करत जात, धर्म, भाषा यापुढे जाऊन त्यांनी एक जबाबदार नागरिक बनावे असा संदेश दिला.
शाला समिती अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रीती अभ्यंकर यांनी विद्यार्थिनींनाजबाबदारिची व्याख्या समजावतस्वतःसाठी समाजासाठी कुटुंबासाठी असणाऱ्या जबाबदारीची जाणीव विद्यार्थिनींना व सर्व उपस्थित त्यांना करून देताना सदैव कृतज्ञतेची भावना अंगी बाळगावी, असाही संदेश दिला तसेच आरशामध्ये पाहताना स्वतःला स्वतःचा अभिमान वाटायला हवा असेच काम आपल्या हातून व्हावयास हवे असेही नमूद केले. विशेषतः पालक व शिक्षक यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की आपण सर्व एका जागतिक स्थित्यंतराचे साक्षीदार होत आहोत त्यामुळे पुढील पिढी घडवत असताना विद्यार्थिनींना सर्व माध्यमातून सकस गोष्टी कशा दिल्या जातील याची जबाबदारी सक्षमपणेपार पाडावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्नेहल गुंजाळ यांनी केले.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More