- Events /
- प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी २०२५ : ७६ व्या प्रजासत्ताक दिनाची सकाळ उत्साह, आनंद आणि देशभक्तीची भावना ज्यात ओतप्रोत भरलेली अशी चैतन्यमयी सकाळ !
समारोहाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लेफ्टनंट कर्नल मा. श्रीमती उषा अतुल श्रीधरन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होऊन झाली. या प्रसंगी शालासमितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती प्रीती अभ्यंकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. शरद कुंटे ,लेफ्टनंट कर्नल मा. श्री अतुल श्रीधरन , प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती अनिता भोसले व पर्यवेक्षिका मा. श्रीमती स्वाती जज्जल, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्या सोबतच संपूर्ण शिक्षकवृंद, शिक्षकेतर, सेवक वर्ग , विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका मा. श्रीमती दीपा अभ्यंकर यांनी हा प्रजासत्ताक दिन आपणा सर्वांसाठी फार विशेष असून आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीस ७५ वर्ष पूर्ण केलेले हे गौरवशाली वर्ष आहे तसेच आजच्या प्रशालांमधून उद्याचा भारत घडतो असे मत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या माझे संविधान - माझा अभिमान तसेच शब्दगंध या हस्तलिखितांचे प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना २१ वर्ष सैन्य दलाच्या नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल मा. श्रीमती उषा अतुल श्रीधरन यांनी सैन्य दलात सामील
होण्यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. तसेच आपल्या देशाच्या प्रगतीसाठी उत्तम नागरिक होणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या रूपाने झाशीची राणींचा आदर्श तुमच्या समोर या समारोहाच्या निमित्ताने ठेवण्यात आला आहे, देशासाठी कर्तृत्व गाजवा , वाचनाची सवय लावून घ्या, त्याने आयुष्य समृद्ध होते, निर्धार, ज्ञानार्जन, परिश्रम आणि कौशल्य विकास हेच प्रत्येकाच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत असे मत मा. श्री शरद कुंटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More