- Events /
- नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 2026-27
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 2026-27
१५ जून २०२६ : मान्यवरांच्या शुभहस्ते देवी सरस्वतीचे पूजन तसेच शाळेच्या गानवृंदाने सादर केलेल्या सुस्वर ईशस्तवनाने करून आनंद आणि भक्तिमय वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.या कार्यक्रमास शालासमिती अध्यक्ष मा. डॉ.प्रीती अभ्यंकर ,प्रशालाप्रमुख मा.श्रीम. दीपा अभ्यंकर, उपशालाप्रमुख मा.श्री. सुरेश वरगंटीवार ,मा.पर्यवेक्षक श्रीम. स्वाती जज्जल, शिक्षक प्रतिनिधी श्रीम. शुभदा राजगुरू,प्रशालेतील शिक्षक आणि प्रशालेत नवप्रवेशित विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा. शालाप्रमुख श्रीम. दीपा अभ्यंकर यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान आणि परंपरांचा अंतर्भाव केला असून सरस्वतीपूजन हा भारतीय संस्काराचा भाग आहे. शाळेत प्रवेश घेताना वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये,आकांक्षा घेऊन आला आहात त्या पूर्ण करण्यासाठी खूप शिका .
शाळेत शंभर टक्के उपस्थितीचे पारितोषिक देण्यात येते हे सांगून शाळेत दररोज उपस्थित राहण्यास सांगितले .त्यानंतर शालासमिती अध्यक्षा मा.डॉ. प्रीती अभ्यंकर यांनी मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साह,ताजेपणा आणि सरस्वतीपूजनाने वातावरण भक्तिमय वाटत आहे असे सांगून नवप्रवेशित विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच वर्तमान पत्रात पाण्याबद्दलच्या बातमीबद्दल आवगत करत पाणी जपून वापरून पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.
त्यानंतर प्रशालेचे पदाधिकारी ,इ.५वी वर्गशिक्षक,नाट्य ,वक्तृत्व, चित्रकला, संस्कृत, विविध क्रीडास्पर्धा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि शिष्यवृत्ती,जपानी भाषा ,गणित प्रयोगशाळा इ.विभागांतील शिक्षकांचा परिचय PPT माध्यमातून करण्यात आला. शिस्तबद्ध शाळा असा नावलौकिक असणाऱ्या प्रशालेतील शिस्तीचे नियम नवागतांना सहा.शिक्षक श्रीम. विमल भवारी यांनी समजावून सांगितले.त्यानंतर सन २०२५-२६या वर्षात १००%उपस्थिती असणाऱ्या कु.श्रेया प्रवीण चव्हाण हीचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
नंतर सरस्वतीच्या श्लोकगायनाच्या साथीने नवागतांनी वहीवर,पाटीवर रेखाटलेल्या सरस्वतीप्रतिमेचे पूजन करून देवीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ' आला आनंद आली बहार'या गाण्यावर इयत्ता दहावीतील सानिका पोटे आणि आदिती भुजबळ यांच्याबरोबर जागेवर बसूनच बहारदार नृत्य केले आणि नृत्याचा आनंद घेतला.त्यानंतर PPT माध्यमातून प्रशालेची ओळख करून घेतली. इयत्ता ६वी,७वी मधील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेली कागदी फुले देऊन नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींचे स्वागत केले.अशाप्रकारे अतिशय उत्साहात, आनंदात हा मनोज्ञ सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आभार मा.पर्यवेक्षक श्रीम. स्वाती जज्जल यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन सहा.शिक्षक श्रीम.रुपाली घाटगे यांनी केले.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More