- Events /
- झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशालेची मानवंदना
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशालेची मानवंदना
१८ जून २०२६ : स्वातंत्र्य लढ्यातील अद्वितीय शौर्य आणि राष्ट्रीय भक्तीचे प्रतीक असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनींनी बालगंधर्व रंगमंदिर चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना दिली. विद्यार्थिनींनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचे स्मरण करीत राष्ट्रसेवा व महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक सुरेश वरगंटीवार तसेच सहाय्यक शिक्षिका दीपाली थोरात, ग्रंथपाल सीमा डोईफोडे, प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी विष्णू बोरसे व सुनिता पवार उपस्थित होते. विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती शिस्त आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More