- Events /
- जलसुरक्षा - व्याख्यान
जलसुरक्षा - व्याख्यान
सुरक्षित जल सुरक्षित भविष्यकाळ' म्हणूनच पाणी वाचवणे,पाण्याचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून प्रशालेतील विद्यार्थिनींमध्ये जलसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून शंभरकोटी लिटर पाणी वाचवणारे, हास्योपचारातून विचारांची दिशा बदलणारे, जलरक्षक, प्रसिद्ध वक्ते श्री.मकरंद टिल्लू यांचे माहितीपूर्ण व्याख्यान शनिवार दिनांक ८फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशालेच्या मैदानावर इयत्ता ५वी ते९वी च्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आले.
विद्यार्थिनींशी संवाद साधत पाण्याचे ,पाणी वाचवण्याचे महत्त्व स्वानुभवातून सहजपणे उलगडून सांगत या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले.हाताने करण्याच्या विविध प्रकारच्या सांकेतिक नळ बंद करणे इ.साठी खुणा शिकवत आपणही पाणी वाचवण्यात आपले योगदान देऊन पाणी वाचवू शकतो,हे विद्यार्थिनींच्या मनात बिंबवून त्यांना सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त केले.सामाजिक सवयींत,व्यक्तिगत सवयींत बदल करून स्वतःचे योगदान देऊन पाणी वाचवण्याचे आवाहन केले.पाणी कुठे वाया जाते,पाणी कुठे वाचवायचे याचा अभ्यास करून ज्ञानदा संस्थेच्या सहयोगातून जलरक्षक म्हणून या अभियानात सहभागी होण्यासाठी विद्यार्थिनींनी आनंदाने टाळ्या वाजवून संमती दर्शवत व्याख्यान आवडल्याचे सूचित केले.त्यानंतर ज्ञानदा इन्स्टिटय़ूट ऑफ फ्लो पाइपिंग टेक्नॉलॉजि चे सीनियर ऑपरेशनल मॅनेजर श्री.आनंद कठापुरकर यांनी व विद्यार्थिनींशी संवाद साधला.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More