- Events /
- आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
शनिवार, दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रशालेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी असणारे अनन्यसाधारण महत्त्व अन्वी असोदेकर ( इयत्ता 6वी गंगा) या विद्यार्थिनीने वर्गवाणीद्वारे अधोरेखित केले. योगासन प्रमुख शिक्षिका श्रीमती धनश्री निकम यांनी वर्गवाणी द्वारे विविध दंड स्थितीतील व बैठक स्थितीतील आसनांच्या कृती सांगून प्रत्येक वर्गात नेमून दिलेल्या स्वयंसेवकांमार्फत इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी तील सर्व विद्यार्थिनींकडून लयबद्ध कृती करून घेतल्या. याच दिनाचे औचित्य साधून प्रशालेत नव्याने प्रवेश केलेल्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींसाठी योग दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व योग प्रशिक्षक श्रीमती तेजश्री बोरुडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्रीमती धनश्री निकम यांनी यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना 'एक पृथ्वी, एक आरोग्य' व त्यामागील उद्देश कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना योगाची पार्श्वभूमी, मानवी जीवनातील योगाचे महत्त्व ,शारीरिक फायदे विद्यार्थिनींना सांगितले. तसेच विविध स्थितीतील आसने विद्यार्थिनींकडून क्रमबद्धपणे करून घेतली. प्रत्येक आसन करून घेताना त्याची योग्य कृती, शारीरिक समतोल, शारीरिक विकासाच्या दृष्टीने महत्त्व, योगातील सातत्य याविषयी सांगितले. या दिनाच्या निमित्ताने प्रशालेतील माजी शिक्षिका श्रीमती. प्रतिभा खेर या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या त्यांनीही विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला.
पाऊसजन्य परिस्थिती व ओले असलेले मैदान या अडचणींमुळे आज प्रशालेत उपस्थित असणाऱ्या 840 विद्यार्थिनी, तसेच प्रशालेतील सर्व पदाधिकाऱ्यांसह 54 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यांनी वर्गामध्येच योगासनांची प्रात्यक्षिके केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय दीपा अभ्यंकर ,उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता भोसले ,पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती जज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील योगासन प्रमुख शिक्षिका श्रीमती धनश्री निकम यांनी इतर शिक्षिका यांच्या सहकार्याने केले.
कार्यक्रम
-
राष्ट्रीय क्रीडा दिन ...
२९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More
-
औषधी वनस्पतींच्या सं ...
२४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More
-
८० वा स्वातंत्र्य दि ...
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More
-
HPV लसीकरण मोहीम
१८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More
-
कालिदास दिन साजरा
१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More