प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • आनंद मेळावा

आनंद मेळावा

आनंद मेळावा

आनंदाने आनंदाचा लुटू आपला वाटा, अहिल्येच्या प्रांगणी आनंद मेळावा मोठा

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रशालेने विद्यार्थिनींच्या आनंदासाठी आनंद मेळावा भरवण्यात आला होता. त्याचे उद्घाटन प्रशालेच्या शाला समिती अध्यक्ष डॉक्टर प्रीती अभ्यंकर आणि माजी विद्यार्थिनी कोमल पाटसकर यांनी केले. आनंद मेळाव्यानिमित्त प्रशालेत एकूण 16 खाऊचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये पौष्टिक पिझ्झा, भेळ ,पाणीपुरी, मसाला पुरी ,चॉकलेट सँडविच, कप केक ,आईस्क्रीम अशा विविध पदार्थांची रेलचेल होती. हे सर्व स्टॉल आपल्या पालकांनी व माजी विद्यार्थिनींनी लावलेले होते. सकाळी आठ वाजता आनंद मेळाव्याचे उद्घाटन होताच, मुलींनी खाऊ घेण्यासाठी स्टॉलवर गर्दी केली .आपला आवडता खाऊ मैत्रिणी समवेत खाण्याची मजा काही औरच! मुलींनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि खेळासोबत खाऊचाही आनंद लुटला. खेळामध्ये काही वैयक्तिक व काही सांघिक खेळांचा समावेश होता.उदाहरणार्थ फुग्याने ग्लासचा पिरॅमिड तयार करणे, पझल सोडवणे ,मोत्याची माळ तयार करणे ,बलून ट्रेन तयार करणे इत्यादी. 

दरवर्षी प्रशालेतील विद्यार्थिनी आनंद मेळाव्याची आतुरतेने वाट पाहत असतात. विद्यार्थिनी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन गेल्या तरी आनंद मेळावाच्या आठवणी त्यांच्या मनात रुंजी घालत असतात. यावर्षी माजी विद्यार्थिनींना सुद्धा आनंद मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले होते. शाळेने माजी विद्यार्थिनींसाठी नोंदणी लिंक आणि क्यू आर कोड स्कॅन ही सुविधाही उपलब्ध करून दिली. 

आनंद मेळाव्या दिवशी प्रत्यक्ष १११ विद्यार्थिनींनी प्रशालेत मैत्रिणी समवेत येऊन खाऊ व खेळाचा आनंद लुटला तसेच २१५ माजी विद्यार्थिनींनी लिंक भरून नोंदणी केली. आनंद मेळाव्यात सर्व शिक्षक व पदाधिकारी यांनीही खेळाचा आनंद घेतला. आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी माननीय शालाप्रमुख सौ. दीपा अभ्यंकर उपशाला प्रमुख सौ.अनिता भोसले पर्यवेक्षिका सौ. आशा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

 

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स