विज्ञान
Posted on March 6, 2025
सौ. रोहिणी पानसे
सहाय्यक शिक्षिकाडोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. जे दिसते ते तसेच का हे उलगडण्याला शिका. वरील गाण्यांच्याओळी मधून आपल्याला लक्षात येईल की, विज्ञान विषय हा निरीक्षण आणि प्रयोग यावर आधारित असतो. आणि याच अनुषंगाने आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थिनींना या दोन्हीसाठी ही प्रोत्साहित केले जाते. प्रशालेमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयाची प्रात्यक्षिके घेतली जातात. प्रत्येक इयत्तेनुसार प्रत्येक धड्यांचे तक्ते तयार करून घेतलेले आहेत, त्याप्रमाणे अध्यापन करत असताना शिक्षक या तक्त्यांचा सुद्धा अतिशय सुयोग्य असा वापर करतात. अनेक विज्ञानातील संकल्पना या पाहून जास्त छान समजतात म्हणून, प्रशालेमध्ये डिजिटल रूम आहेत .या डिजिटल रूमचा वापर विद्यार्थिनींना विज्ञान विषयाचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवून अध्यापन करण्यासाठी केला जातो.
प्रशालेमध्ये विज्ञान मंडळ कार्यरत आहे विज्ञान मंडळाअंतर्गत दर महिन्याला विद्यार्थिनींना विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळी व्याख्याने आयोजित केली जातात. यामध्ये काही कृतीयुक्त कार्यशाळा यांचाही समावेश केला जातो मुलींना स्वतः प्रयोग करून संकल्पना समजून घेता याव्या यासाठी प्रशालेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्गामधील प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही तिला जमेल तसा एक प्रयोग सादर करते. यामधून प्रत्येक वर्गात निवडलेल्या प्रयोगांचे पुन्हा एक सर्व विद्यार्थिनींसाठी विज्ञान प्रदर्शन भरवले जाते.परीक्षण करून यामधून नंबर काढले जातात व विद्यार्थिनींना बक्षीसेही दिली जातात.
विज्ञान विषयाच्या संदर्भात जी ठिकाणे आहेत अशा ठिकाणी विद्यार्थिनींची क्षेत्रभेट आयोजित केली जाते. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विद्यार्थिनी आयुका या ठिकाणी विज्ञान विषयाच्या व्याख्यानासाठी जातात.
IISER द्वारे आयोजित केलेल्या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थिनी IISER या ठिकाणी दर रविवारी निवडक संकल्पनांवर आधारित hands on म्हणजे स्वतः प्रयोग करून बघण्यासाठी जातात. जिल्हा परिषद आयोजित विज्ञान वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा व विज्ञान प्रकल्प स्पर्धा यामध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता व यामध्ये त्यांनी उत्तम यश मिळवले विज्ञान प्रकल्पाचे जिल्हास्तरापर्यंत निवड झाली होती. याशिवाय विज्ञान विषयक इतर माहिती मिळण्यासाठी विद्यार्थिनींना वेगवेगळ्या परीक्षांना बसवले जाते .
यामध्ये डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा, मराठी विज्ञान परिषद आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी अशाप्रकारे प्रशालेत विज्ञान या विषयाचे अध्यापन विद्यार्थिनींना सर्वांगीण दृष्टिकोनातून केले जाते.